उद्या सकाळी ९ वाजता मी पोहोचतोय मालवणमध्ये !
आमचे प्रेरणास्थान, आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे.. ज्या महाराजांचे किल्ले आज ३५० वर्षांनीही आपल्याला प्रेरणा देत आहेत त्यांचा पुतळा, तोही पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला, एक वर्षेही टिकत नाही, हे मनाला पटतच नाही आहे.. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या सरकारला किती बेगडी आदर आहे हेच यातून दिसतंय... या सरकार चा निषेध करावा तेवढा कमी आहे...
या सर्व घटनेबद्दल आढावा घ्यायला व पुढील दिशा ठरवायला एक शिवप्रेमी म्हणून मी उद्या सकाळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मालवणात, घटनास्थळी भेट देणार आहे.